डिचोली/प्रतिनिधी
राज्यतील अळंबी खवय्यांना सुखावणारी अळंबी कारापूर तिस्क येथे दाखल झाली आहे. सध्या आलेली अळंबी हि काही प्रमाणात बरीक असली तरी या मोसमातील पहिल्या पिकाचा आस्वाद घेण्याची संधी अळंबी खवय्यांना करून देण्यासाठी अळंबी विपेते अळंबी विक्रीसाठी उपस्थित झालेले आहेत. सध्या प्रति पुडी रू. 400 प्रमाणे दर आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याचा जोर वाढला की लोकांना अळंबीची चाहूल लागण्यास सुरूवात होते. मुसळधार पाऊस पडल्यानंतर एक दोन दिवस उन पडल्यावर वारूळावर अळंबी उगवण्यास प्रारंभ होतो. गावातील जंगलांमध्ये असलेल्या ठरविक वारूळांवर प्रथमच अळंबी काढणाऱयांची नजर असते. अळंबी उगवल्याचे समजताच सदर वारूळांवर पाळत ठेवणे, दररोज नियमित त्या अळंबींचे इतरांपासून संरक्षण करण्याइतका व्याप अळंबी काढणारे करीत असतात. काही ठिकाणी तर वारूळे झाडा झुडपांनी लपवूनही ठेवली जातात. त्यामुळे अनेकांना जंगलात गेल्यावर सदर वारूळे दिसूनही येत नाहीत.
यावषी या ना त्या कारणांमुळे पावसाला लवकरच सुरूवात झाली होती. मे महिन्यात असानी वादळामुळे हवामानात झालेला बदल आणि गोव्यात चार दिवस पडलेल्या पावसामुळे अनेक पावसात उगवाणारी वनस्पती मे महिन्यातच उगविलेली पहायला मिळली होती. जून महिन्याच्या मध्यावर खाण्यासाठी तत्रार होणारा ताकळा भाजी मे महिन्यातच खाण्यालायक बनल्याचे दिसून येत होती. सर्वत्र ताकळा मे महिन्यातच फुललेला दिसून येत होता.
त्याचप्रकारे अळंबी उगवण्यासाठी मे महिन्यातील पावसामुळेच पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जून महिन्यात मोन्स?नच्या स्वरूपात पडलेला मुसळधार पाऊस आणि नंतर अधूनमधून आलेले उन यामुळे अळंबी उपटण्यास साजेशी रूजून आली होती. या अळंबीच्या उगवण्यावर लक्ष ठेऊन असलेल्या ठराविक तज्ञ लोकांनी ती उपटून विक्रीसाठी आणल्याने ती लोकांना उपलब्ध झाली आहे.
साखळी ते डिचोली मार्गावरील कारापूर तिस्क येथे एका ठराविक जागेवर सर्वप्रथम अळंबी विक्रीला प्रारंभ होतो. त्याच जागेवर काल शनि. दि. 2 जुलै रोजी काही अळंबी विपेते अळंबीच्या पुडय़ा घेऊन विक्रीसाठी उपस्थित होते. दर विचारला असता बारीक अळंबीचा वाटा रू. 400 प्रति, तर मोठी अळंबी असलेला वाटा रू. 500 प्रति प्रमाणे होता. दरांमध्ये वाणपण केल्यास काहीजण 50 रू. कमी करीत होते. तर काही विपेते एक पैसाही कमी करण्यासाठी तयार नव्हते.
यावेळी पाऊस लवकर पडल्याने अळंबी पीक लवकरच आल्याचे हे विपेते सांगत होते. तर पुढील काळात मुसळधार पाऊस पडून नंतर उन आल्यास अळंबीचे पीक झटक्मयात वाढणार, असेही हे विपेते सांगत होते. अळंबीची आवक वाढल्यास दरांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्मयता आहे. दरांमध्ये घट झाल्यास ती सामान्यांच्या खिशाला परवडणार. सध्यातरी पुडीमधील अळंबींचा आकार आणि संख्या पाहता हे दर सामान्यांना परवडणारे नसल्याचे दिसून येते.









