कोल्हापूर / राजेंद्र होळकर
कळंबा येथील आय टी आय कॉलेजमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैदाने उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. तानाजी दिलीप मंगे (वय २ ९ , रा . उमरगा अडत लाईन एकोंडी रोड , ता उमरगा जि . उस्मानाबाद सध्या रा. तात्पुरते आय टी आय कारागृह) असे त्याचे नाव आहे.
याबाबत जुना राजवाडा पोलिसात संदीप जयसिंग पाटील (वय ३२ , रा . केनवडे ता कागल सध्या रा . कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, कैदी तानाजी दिलीप मंगे याला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी आय टी आय बॉईज होस्टेलमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात केली आहे. अशा या न्यायाधीन बंदीने लघवीला जाण्याचा बहाणा करून, घरातील कोणत्यातरी कारणाच्या तणावावरुन, आय टी आय मधील तात्पुरत्या आय टी आय कारागृहाच्या पहील्या मजल्याच्या गॅलरीतुन जमिनीवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.









