प्रतिनिधी/ गोडोली
सातायातील कारागृहात आधी दोन आणि नंतर पाच कोरोना बाधित आल्यानंतर सर्वांची धास्ती वाढली. आता शहरात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली.मात्र यावेळी शहरावरील संसर्गाचे घोंगावणारे संकट निरंजन फडणीस आणि त्यांच्या तीन सहकार्यांनी दूर केले.स्वयंस्फूर्तीने संपूर्ण कारागृह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीनरींव्दारे निर्जंतुकीकरण करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
जगात कोरोनाचे संकट रोज धास्ती वाढवत आहे. सातायात सध्या 14 रुग्ण असून पैकी 7 हे कारागृहातील कैदी आहेत.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारागृहातील रुग्णांमुळे संकट गडद होण्याची शक्यता वाढली होती. याच वेळी सातायात सर्वपरिचित असलेल्या एन.पी.हायड्रोजेट क्लिनींग सर्व्हिसचे मालक निरंजन फडणीस यांनी कारागृह निर्जंतुकीकरण करून देण्यासाठी परवानगी द्यावी, अशी अधिकायांना विनंती केली. संसर्गाचा धोका असल्याचे गांभीर्य समजून घेतले. यावेळी पीपीए किट आवश्यक असल्याचे सांगितले गेले. ते किट आर्यन प्लास्टिकचे प्रमोद शिंदे यांनी ते उपलब्ध करून दिले. अतिशय जोखीम घेऊन निरंजन फडणीस, सोमनाथ लोंढे, विजय पोगाडे,उमेश बोबाटे,प्नकाश अडागळे यांनी संपूर्ण कारागृह योग्य औषधांची दोन दिवस परिश्रम पुर्वक फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले. यामुळे सातायातील संसर्गाचे संकट कमकुवत झाले. सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल या पा जणांचे शहर परिसरात चर्चा सुरू झाली आहे.









