15 लाखाच्या मुद्देमालासह चौघांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
टाटा हेक्सा कारमधून गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक होत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. साहाय्यक अबकारी आयुक्त बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मुडलगी तालुक्मयातील संगणकेरी क्रॉसजवळ धाड टाकून वाहनासह दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल 15 लाख 35 हजार रुपये किमतीचा असल्याचे सांगण्यात आले.
संशयित आरोपी आनंद राजू कोप्पद (रा. गोकाक), चिदानंद अर्जुन बिरडी (रा. वडरेट्टी), रवी यमनाप्पा बागेवाडी (रा. तुक्मयानट्टी), शानूर मेहबूब करीपल्ली (रा. गोकाक) हे कार क्रमांक केए 51 एएफ 3902 मधून गोवा बनावटीची दारू बेकायदा वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुडलगी तालुक्मयातील संगणकेरी क्रॉसजवळ अचानक धाड टाकली.
पोलिसांनी दारू जप्त करून गोकाक पोलीस स्थानकामध्ये या सर्वांवर गुन्हा नोंदविला आहे. अबकारी विभागाचे विजयकुमार हिरेमठ यांच्यासह इतर पोलिसांनी अचानकपणे ही धाड टाकून दारू जप्त केली आहे. या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.









