प्रतिनिधी/ कारवार
74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कारवार जिल्हय़ात 75 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 115 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान शुक्रवार भटकळ तालुक्यात एक कोरोना बाधित दगावला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण मृत्यसंख्या 29 इतकी झाली आहे.
शुक्रवारी नोंद झालेल्यांमध्ये हल्याळ तालुक्यात 37, शिरसी 21, कारवार 5, अंकोला 4, कुमठा आणि मुंदगोड तालुक्यातील प्रत्येकी 3 आणि भटकळ व यल्लापूर तालुक्यातील प्रत्येकी एक बाधिताचा समावेश आहे.
शुक्रवारी बाधितांच्या संख्येत 75 इतकी भर पडल्याने एकूण संख्या 3,143 इतकी झाली आहे. यापैकी हल्याळ तालुक्यातील 929 इतकी झाली आहे. यामध्ये दांडेली तालुक्यातील बाधितांचा आकडा मोठा आहे. शुक्रवारी 115 संसर्गमुक्त झाले आहेत. यामध्ये हल्याळ तालुक्यातील 65 जणांनी कोरोनावर मात केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कारवार तालुक्यालाही बऱयापैकी दिलासा मिळाला आहे. कारवार तालुक्यातील 23 रुग्ण, भटक 16, मुंदगोड 6, जोयडा 5, आणि होन्नावर तालुक्यातील एक रुग्णाला कोरोनावर मात करण्यात यश आले आहे.









