प्रतिनिधी / कोल्हापूर
मागील आठवड्यापासून राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. गेले चार पाच दिवस एस टी सर्व कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत. हा संप एस टी महामंडळाचे शासनात विलीनकरण करण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या कडून सुरु आहे. या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा ही उगारला जात आहे. याच कारवाईच्या भीतीने एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे.
अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असुन ते 2015 साली कामावर रुजू झाले होते. कांबळे हे गारगोटी जवळील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी आहेत. ते सद्या सध्या सावंतवाडी आगार चालक कम वाहक म्हणून काम करत होते. संप असल्याने ते सद्या मडीलगे येथे वास्तव्यास होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नाकडे दुर्लक्ष केले हाेते. त्यामुळे सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे एसटी संपासाठी बळी जाणाऱ्यांची संख्या दुर्देवाने वाढतच असल्याचे सद्या चित्र आहे.
तरी ही राज्य शासन याची गांभिर्याने दखल घेत नसल्याचे आंदोलन कर्त्यांचे मत आहे. आर्यन खान सारख्या विषयासाठी राज्य शासन तात्काळ बैठका घेत. मात्र एसटी सारखा राज्यव्यापी संप सुरु असुन ही राज्यशासन दुर्लक्ष करते आहे. असे ही आंदोलकांचे मत आहे. याच पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे. यासाठी शासनाने ठोस भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढण्यापुर्वीच शासनाने योग्य तोडगा काढणे अत्यावश्यक बनले आहे.









