प्रतिनिधी / हातकणंगले
आळते (ता. हातकणंगले ) येथील रामलिंग फाटयानजीक विदेशी दारू विक्री करणारया वाहनावर हातकणंगले पोलीसांनी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाई दरम्यान या कारमधून सुमारे ९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. धक्कादायक बाब म्हणजे या कारवर अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावून विदेशी बनावटीची दारू विक्री केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्रविण ईश्वर जानवेकर,(वय-४५), अमर मधुकर दबडे (४२ दोघे रा. इचलकरंजी) व शिवाजी सज्जनराव इंगवले. (५० रा. हातकणंगले) अशी या ताब्यात घेतलेल्या तिघा संशयित आरोपीना नावे आहेत.
मिळालेल्या माहीती अशी की, रामलिंग रोडवर आळते हद्दीत एका घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये “अत्यावश्यक सेवा असा बोर्ड लावलेल्या (एम.एच. ०९ .ऐ.क्यु.११३६) इनोव्हा कारमधून विदेशी बनावटीची दारू विक्री करत असलेची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी या कारमध्ये विदेशी बनावटीची २३०३९ रुपये किंमतीची दारू १व चारचाकी वाहन ९,५०,००० असे एकूण ९,७३,०३९ मालासहीत प्रविण जानवेकर, अमर दबडे व शिवाजी इंगवले या संशयित आरोपीना ताब्यात घेतले. ही कारवाई कॉ. अतुल निकम, कॉ. विठठल जाधव, कॉ. संग्राम खराडे,कॉ. भूषण शेटे, कॉ. गायकवाड, कॉ. लाड यांनी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









