प्रतिनिधी/ बेळगाव
येथील जे. एन. मेडिकल कॉलेजच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या कारमधून सर्प बाहेर पडल्यामुळे विद्यार्थ्यांची गाळण उडाली. मात्र सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी हा सर्प सुरक्षितरित्या पकडून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. कॉलेज विद्यार्थिनीची असणाऱया कार मधून हा सर्प बाहेर निघाला. त्यानंतर सर्पमित्रांना चिठ्ठी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी शिताफीने सुरक्षितरित्या पकडला आणि त्याला जीवदान दिले. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला दिलासा मिळाला.
बेळगाव मध्ये हा सर्प प्रथमच सापडला असल्याचे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगीतले.









