बेंगळूर जिह्यातील एका ग्राम पंचायतीला बजावण्यात आली नोटीस
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायतवर पत्नी निवडून आल्यानंतर पतीदेवच ग्राम पंचायतीचा कारभार पाहत असतात, अशा तक्रारी वाढल्या आहेत. मात्र पत्नीच्या कामामध्ये पतीने हस्तक्षेप करणे हा मोठा गुन्हा असून त्यांच्यावर फौजदारी खटलाही दाखल होऊ शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. बेंगळूर येथील कुलवनहळ्ळी ग्राम पंचायतीला याबाबत बेंगळूरच्या ग्रामांतर व जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांनी नोटीस बजावली आहे. असेच प्रकार बेळगाव तालुक्मयातील ग्राम पंचायतमध्येही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेव्हा अशा कारभाऱयांनी दम धरला नाही तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
ग्राम पंचायतीवर निवडून आल्यानंतर पती किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणताही हस्तक्षेप करणे हा गुन्हा आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. बेंगळूर येथील कुलवनहळ्ळी ग्राम पंचायतीला भेट देण्यासाठी बेंगळूर पंचायतीचे अधिकारी गेले असता तेथील लोकांनी याबाबत तक्रार केली. या ठिकाणी ज्या महिला ग्राम पंचायत सदस्या आहेत; त्यांचे पती येथील ग्राम पंचायतीचा कारभार पाहत आहेत, असा आरोप केला. त्याची दखल ग्राम पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या बेंगळूरच्या मुख्य अधिकाऱयांनी घेतली.
तातडीने याबाबत अधिकाऱयांनी चौकशी करून ही नोटीस दिली आहे. कोणीही हस्तक्षेप करत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास मुभा असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे पत्नीचा कारभार पाहणाऱया पतीदेवांना चांगलाच दणका बसणार आहे. बेंगळूर येथे हा प्रकार निदर्शनास आला तरी संपूर्ण राज्यामध्येच अशा घटना घडत आहेत. त्यामध्ये बेळगावचाही प्रामुख्याने क्रमांक लागतो.
‘तरुण भारत’ने नुकतीच ‘कारभारी आता जरा दमानं…’ या मथळय़ाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. आता यापुढे अशा प्रकाराची थेट तक्रार करण्यात आल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. ग्राम पंचायतमध्ये पत्नीचा कारभार पतीदेव सांभाळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बैठका किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमच्या ठिकाणी हजर राहणे, याचबरोबर कोणत्यावेळी सही करायची? कोणत्या ठिकाणी सही करायची? हे पतीदेवच ठरवत आहेत. त्यामुळे बेंगळूर येथील एका ग्राम पंचायतीला मुख्य कार्यनिर्वाह अधिकाऱयांनी नोटीस बजावली आहे. आता बेळगावातही तक्रारी देण्यास नागरिकांनी पुढाकार घेतल्यास संबंधित ग्राम पंचायतमधील पतीदेवांच्या हस्तक्षेपाला आळा बसण्याची शक्मयता आहे.









