वार्ताहर/ कारदगा
कारदगा येथे तिसरी आघाडी व विकासरत्न पीकेपीएसच्यावतीने पत्रकारांचा कोरोना योद्धय़े म्हणून इलाई अत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सुभाष ठकाने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यानंतर पत्रकार रंगराव बन्ने, तानाजी बिरणाळे, प्रशांत कांबळे, विपुल ढेरे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विकासरत्न पी.के.पी.एस.चे चेअरमन राजू खिचडे म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असून तोच खरी क्रांती घडवू शकतो. कोरोना काळात पत्रकारांनी स्वतःच्या व आपल्या परिवाराची काळजी न समाजाला कसे सावरावे याबद्दल आपल्या लेखणीतून जागृती केली. हे आम्ही जवळून पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आम्ही त्यांना यापुढेही बळ मिळावे म्हणून सत्कार करून गौरवित असल्याचे सांगितले. तर रंगराव बन्ने,तानाजी बिरणाळे, प्रशांत कांबळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी सोमराया गावडे, संजय गावडे, उत्तम मुरकुंडे, संतोष बुडके, पांडुरंग बुडके, बट्टू हंडे, दिलीप खोत, महादेव डांगे, सचिन जाधव, बाहुबली माणगावे, प्रमोद रत्नाकर, बापू वडर, भरमा कगुडे, नितीन शिंदे, रवी माळगे, सिकंदर पटेल, अभिजित देसाई, गणेश मोरबाळे, अमोल बुडके, विपुल धरणगुत्ते यांच्यासह तिसरी आघाडी व विकासरत्न संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.









