वार्ताहर/ भुईंज
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या पुढील बाजुस व खंबाटकी बोगद्याच्या अलीकडे सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. चालकाला झोप आल्याने कारवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हाडरला धडकलेने हा अपघात झाला.
याबाबत भुईंज पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत खंबाटकी बोगद्याच्या अलिकडे पुणे बाजूकडे निघालेले इनोव्हा कार क्र. श्प् 14 अ 6666 ही कार कर्नाटक येथील गोकर्ण महाबळेश्वर येथून दर्शन घेऊन पुण्याबाजुकडे निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने जोरदार अपघात झाला. कारमध्ये सात जण प्रवास करत होते. यात रंजना ज्ञानेश्वर सराफ (वय 52), आणि कांताई वाल्मिक जाधव (वय 70) या मायलेकींचा जागीच मृत्यु झाला.
तर प्रतिक ज्ञानेश्वर सराफ (वय 28), नेहा प्रतीक सराफ (वय 25), प्रशांत ज्ञानेश्वर सराफ (वय 32), इशा प्रशांत सराफ, ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ (वय 60), व पुजा शशिकांत जाधव वय दिड वर्षे हे गंभिररित्या जखमी आहेत.
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस स्टेशचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे, आनंदराव भोसले व भुईंज पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे असून सपोनि रमेश गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार आनंदराव भोसले अधिक तपास करित आहेत.
अपघात ठिकाणी नायलॉन दोरीत संरक्षण करावे
पाचगणी घाटात अपघात स्पॉट आहेत तिथे जसे नायलॉन दोरीमध्ये संरक्षण केले आहे. तसेच संरक्षण भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील अपघात स्पॉट आहेत. तिथे बसवण्यासाठी पाठपुरावा करणार असेल्याचे भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे यांनी यावेळी सांगितले.









