कणकवली / वार्ताहर:
कणकवलीहून जानवली येथे जात असलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारची धडक बसली. अपघातात दुचाकीवरील विजय गोविंद जाधव ( ५२, कलमठ ) व नीलम मोहन गवाणकर ( ३०, आशिये ) हे वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील जानवली येथे मंगळवारी सकाळी ९.२० वा. सुमारास घडला. जखमींना उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजय जाधव हे वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत असून नीलम गवाणकर या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत . दोघेही जानवली येथे सुरु असलेले कोरोना लसीकरण येथे ड्युटी बजावण्यासाठी जात होते, तेव्हा हा अपघात घडला.