कसबा सांगाव / वार्ताहर
कारचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला असता मागे बसलेली चिमुकली खिडकीतून बाहेर जोराची फेकली गेली. यात डोक्यात जोराचा मार लागल्याने आठ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. अनया सुनील चौगुले असे या मृत मुलीचे नाव आहे. ही घटना सातारा नजीक चींदे पिर खिंड येथे सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेने कसबा सांगाव मधील महावीर नगर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, सुनील चौगुले हे आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत पुण्याहून नातेवाईकांना भेटून चार चाकी गाडी मारुती अल्टो 800 (एम एच 09 ई जी O428) या गाडीतून परत येत होते. सातारा येथे चिंदे पीर खिंडीजवळ आले असता सुनील यांनी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला. यावेळी मागे बसलेली अनया खिडकीतून बाहेर फेकली गेली. याच वेळी चार चाकी गाडी जोरात पलटी झाली. यामध्ये अनया च्या डोक्यात जोराचा मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दैव बलवत्तर म्हणून गाडीमध्ये बाकीचे तिघेही बचावली गेले. सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









