नव्वदीचं दशक गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आजही तितक्याच सुंदर दिसतात. वयाची चाळीशी, पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्यांच्यातला चार्म कायम असतो. करिश्मा कपूरच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. तिची तुकतुकीत त्वचाही तिच्याबद्दल बरंच काही सांगते. तिच्यासारखी तंदुरूस्ती टिकवणं आपल्यालाही जमेल का? जाणून घेऊ या लोलोची गुपितं.
- बॉलिवूडमधल्या बर्याच सेलिब्रिटींप्रमाणे करिश्मा कपूरनेही योगासनांना महत्त्व दिलं आहे. योगासनं करत असतानाचे फोटो ती कायम शेअर करत असते. फिटनेससोबतच शरीर लवचिक बनवण्याच्या दृष्टीनेही योगासनं लाभदायी ठरतात. म्हणूनच लोलोचा योगावर भर असतो. योगामुळे वजन कमी होतं. तसंच रक्ताभिसरण सुधारतं.
- करिश्माचं आहाराकडेही विशेष लक्ष असतं. आरोग्यदायी पदार्थ खाण्यावर तिचा भर असतो. इन्स्टाग्रामवर ती तिचे डाएट सिक्रेट्स पोस्ट करत असते. तिची त्वचा इतकी तजेलदार का आहे हे याबद्दल वाचल्यानंतर आपल्याला कळू शकतं.
- तिच्या न्याहारीत वेगवेगळ्या बेरींचा समावेश असतो. स्ट्रॉबेरी, रॉसबेरी, ब्लूबेरी अशी फळं ती खाते. या बेरींमध्ये विविध प्रकारची अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराचं रक्षण होतं. तसंच त्यात क आणि के ही जीवनसत्त्वं, मँगनीज आणि फायबर असतात या बेरीजमुळे रक्तातली साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर करिश्मा न्याहारीला कलिंगडही खाते.
- करिश्माला कॉफीही आवडते. प्रमाणात कॉफी प्यायली तर ती वजन कमी करायलाही मदत करते. तसंच त्यामुळे मेंदूचं कार्य सुधारतं.









