प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील कामेरी येथे घराची कडी काढून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी मध्यरात्री अनिल बाळासो पाटील यांच्या घरी ही चोरी झाली. चोरटयांनी ७५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह दोन तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केली.
अनिल पाटील हे शेती करतात. त्यांच्या भाचीचे दि.७ एप्रिल रोजी लग्न होते. या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून त्यांनी ७५ हजार रुपये व दोन तोळे वजनाची पिळयाची अंगठी घरातील कपाटात ठेवली होती. पण ही रक्कम व अंगठीची गरज न भासल्याने ती कपाटातच ठेवली. दि.७ रोजी विवाह उरकून आल्यानंतर पाटील व कुटुंबिय जेवणखान करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झोपी गेले.
दरम्यान, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या आईस जाग आली. त्यावेळी त्यांना कपाट असणाऱ्या खोलीत लाईट सुरु असल्याचे दिसले. तसेच पैसे व सोने ठेवलेले कपाट उघडे दिसले. म्हणून त्यांनी अनिल पाटील यांना उठवले. यावेळी त्यांनी जावून पाहिले असता, कपाट उघडे होते. या कपाटातील लॉकर मधील रोख ७५ हजार रूपये व सोन्याची अंगठी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्या चुलत भाऊ सागर पाटील यास घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पाटील यांनी गुरुवारी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
Previous Articleमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात!
Next Article मार्चमध्ये टायटनची विक्री तेजीत








