महामंडळाचे बोटचेपी धोरण, कारवाईचा कर्मचाऱ्याकडून निषेध
प्रतिनिधी / मिरज
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या सव्वा महिन्यांपासून बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, मिरज आगारात पाचशपैकी दोनशे कर्मचारी कामावर हजर झालेले असतानाही एसटी वाहतूक नियंत्रकाची बदली आणि 12 कर्मचाऱ्याना बडतर्फ करण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत एसटी महामंडळाच्या या बोटचेपी धोरणा विरोधात एसटी कर्मचारी आणखीनच आक्रमक झाले आहेत.