अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. दरदिनी स्वतःचे आगामी चित्रपट आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सारा अलिकडे आसाममधील प्रख्यात कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. याची काही छायाचित्रे साराने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. सारा या छायाचित्रांमुळे ट्रोलर्सचे लक्ष्य ठरली आहे. ट्रोलर्स तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
आसामच्या पारंपरिक गमछासह सारा या छायाचित्रांमध्ये दिसून येते. ‘शांती, धन्य आणि कृतज्ञ’ असे तिने कॅप्शनमध्ये नमूद पेल आहे. साराच्या या छायाचित्रांवर अनेक जण कॉमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तर काही युजर्स तिच्या धर्माचा मुद्दा उपस्थित करत आहेत.
‘अतरंगी रे’ मध्ये दिसणार सारा
साराने 2018 मध्ये अभिषेक कपूर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे स्वतःची अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत हा तिचा नायक होता. चित्रपटातील साराच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. साराने ‘सिंबा’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत भूमिका साकारली होती. सारा लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ आणि ‘नखरेवाली’मधूनही ती झळकणार आहे.









