प्रतिनिधी/ पणजी
भक्तांच्या हाकेला धावणारी, प्रत्येकाची इच्छा-मनोकामना पूर्ण करणारी, साक्षात्कारी देवी म्हणून ख्याती असलेल्या शिरोडा फोंडा येथील श्रीकामाक्षी देवस्थानच्या कुळावी वांगडी मंडळातर्फे आयोजित सग्रह हवनद्वारा नवचंडी अनुष्ठान आज दि. 1 जानेवारी 23 रोजी थळ शिरोडा येथील श्रीसंस्थानच्या पवित्र प्रांगणात होणार आहे.
कुळावी वांगडी मंडळाची नोंदणीकृत संस्था असलेल्या श्रीकामाक्षी रायेश्वर रामपुरूष प्रतिष्ठानच्या माध्यमातून या नवचंडी अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकामाक्षी देवीची इच्छा आणि कृपाशीर्वादाने यंदाचे हे 18 वे अनुष्ठान असून त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी 8.15 वा. देवता प्रार्थना, गणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, देवनांदी, कंकुमार्चन पूजा, नवग्रहहोम, सप्तशती पाठ, पूर्णाहुती, आरती, महाप्रसाद, आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर संध्या. 4 वा. भजनाचा कार्यक्रम, सायं. 7 वा. पूष्पपूजा, आरती व तीर्थप्रसाद होणार आहे.
सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रीकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुळावी वांगडी मंडळातर्फे करण्यात आले आहे.









