ऑनलाईन टिम : अमरावती
प्रमुख विरोधी पक्ष तेलगू देसम पक्षाच्या 11 सदस्यांना मंगळवारी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आरोपावरून आंध्र प्रदेश विधानसभेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी टीडीपी आमदारांवर जोरदार टीका करून त्यांना “सभ्य पद्धतीने” वागण्यास सांगून सभागृहाचा कारभार चालू ठेवला. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील 18 लोकांच्या गूढ मृत्यूवर चर्चेची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने, विधानव्यवहार मंत्री बुग्गाना राजेंद्रनाथ यांनी टीडीपी आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
आवाजी मतदानाने हा प्रस्ताव पार पडल्यानंतर निलंबित सदस्यांनी सभागृह सोडले. सोमवारी, याच मुद्द्यावरून टीडीपीच्या पाच आमदारांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीसाठी (25 मार्चपर्यंत) विधानसभेतून निलंबित करण्यात आले.









