ऑनलाईन टीम
काल, गुरुवारी काबूल विमानतळ झालेल्या स्फोटांनी अफगाणिस्तान हादरले. या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतापले आहेत. या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा गंभीर इशाराच त्यांनी तालिबान्यांना दिलाय. व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिला.
आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि यासाठी हल्लेखोरांना माफीही मिळणार नाही असं बायडेन म्हणाले. “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असं बायडेन म्हणाले.
काबूलमधील हल्ल्यांनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही वेळ मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अमेरिकेचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. “हे कोणी घडवून आणलं आहे याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे पण त्याबद्दल आपल्याला अद्याप खात्री नाहीय,” असंही ते म्हणाले. तसेच या हल्ल्यांनंतरही अमेरिकेकडून सुरु असणारी बचाव मोहीम सुरु राहणार असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









