काबूल: तालिबानने काबूल शहरावर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तान नागरिक देश सोडण्यासाठी विमानतावर गर्दी करत आहेत. यातच तालिबान्यांची हिंसक वृत्ती समोर येत आहे. दरम्यान, तालिबानीपासून जीवाला धोका असल्याने अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी असल्याने परिस्थिती तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. विमानतळाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचा वृत्त ब्रिटीश लष्कराने दिलं आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्याने तेथील नागरिकांना तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची ब्रिटीश लष्कराने दिली माहिती आहे.
Previous Articleऑलिम्पियन फुटबॉलपटू एस. एस. हकीम यांचे निधन
Next Article मिलिंद नार्वेकरांचा बंगलो तोडला!









