काबुल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अनेक जण देश सोडून जाण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी करत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात अनेकांनी आपला जीव गमावलाय. मीडिया रिपोर्टनुसार, काबुल विमानतळावरील स्फोटातील मृतांचा आकडा १०० च्या पुढे गेला असून, यात १३ अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, या स्फोटानंतर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानने भावुक पोस्ट केली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानने सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले आहे. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ल्यांसह तीन स्फोट झाले, ज्यात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राशिदने एक ट्वीट केलं आहे. ते ट्विट सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्याने ‘काबूलमध्ये पुन्हा रक्त वाहत आहे. अफगाणिस्तानच्या लोकांना मारणे थांबवा’, असे राशिदने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले.
राशिद खानचे हे ट्वीट आतापर्यंत १० हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आले आहे. राशिद सध्या आपल्या कुटुंबापासून दूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे कुटुंब अफगाणिस्तानमध्ये आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









