काबुल: अफगाणिस्तानमध्ये काबुल येथे चार दिवसानंतर पुन्हा स्फोट झाला आहे. याआधी गुरुवार २६ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक बॅरन हॉटेल आणि विमानतळाचे अॅबे गेट यांच्या दरम्यान एक असे दोन स्फोट झाले होते. या घटनेनंतर आज पुन्हा काबुलमध्ये दुसरा स्फोट स्फोट झाला. दरम्यान अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शनिवारी दिला होता. पुढील ७२ तासांच्या आत हल्ला होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते. त्यामुळे जो बायडन यांचा अंदाज खरा ठरला आहे.
काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटांमध्ये अमेरिकेच्या तेरा जवानांसह १८२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक मुले आणि महिला होत्या. या घटनेनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात आयसिस – के या दहशतवादी संघटनेला लक्ष्य करुन ड्रोनद्वारे ‘एअर स्ट्राईक’ केला. या हल्ल्यात गुरुवारी काबुलमध्ये स्फोट करण्याच्या कटात सहभागी असलेल्या दोन प्रमुख दहशतवाद्यांना ठार केल्याचे अमेरिकेने जाहीर केले. अमेरिकेने शनिवारी ‘एअर स्ट्राईक’ केल्याची घोषणा केली आणि रविवारी काबुलमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला.
अमेरिकेने शनिवारी गुप्तचर यंत्रणेने धोक्याचा इशारा दिला होता. काबुलमध्ये पुढील ७२ तासांच्या आत दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली होती. हा धोक्याचा इशारा खरा ठरला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









