ऑनलाईन टीम / काबुल :
दहशतवादी गटांकडून काबुल विमानतळाच्या दिशेने आज सकाळी 5 रॉकेट डागण्यात आले. मात्र, सतर्क असलेल्या अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेने मिसाईल इंटरसेप्टर्सने हे रॉकेट हवेतच नष्ट करुन दहशतवादीडाव हाणून पाडला.
काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने अमेरिकन संरक्षण यंत्रणा सतर्क होती. तसेच विमानतळ परिसरात अलर्ट जारी करण्यात आला होता. रविवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानंतर आज सकाळी दहशतवादी गटाने काबुल विमानतळाच्या दिशेने पाच रॉकेट डागली. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेने ही रॉकेट नष्ट करुन दहशतवादी डाव हाणून पाडला. उत्तर काबूलमधून एका वाहनातून हे रॉकेट डागण्यात आले होते. त्याचवेळी विमानतळाच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेचे आवाज स्थानिक नागरिकांनी ऐकले. बॉम्बचे तुकडेही क्षेपणास्त्रातून पडल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. मात्र, त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.









