काबुल: तालिबानला नेहमी पाकिस्तानच समर्थन राहिलं आहे. तालिबान्यांना पाकिस्तानने आसरा दिल्याचं बोललं जात. आत अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शनांना वेग आला आहे. किंबहुना अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर येण्यास मदत केल्याबद्दल लोकांचा राग पाकिस्तानविरोधात आहे. त्यामुळे अफगाणिस्तान नागरिकांनी पाकिस्तानचा विरोध करण्यासाठी काबुलमध्ये रॅली काढली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक हातात फलक घेऊन घोषणा देत होते – ‘पाकिस्तान – पाकिस्तान, सोडा अफगाणिस्तान’. काबूलमधील सेरेना हॉटेलच्या दिशेने आंदोलक मोर्चा काढत होते, जेथे पाकिस्तानी आयएसआय प्रमुख राहत आहे.
दरम्यान, तालिबानने पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असल्याचे अफगाण नागरिक बोलत आहेत. त्यांमुळे पाकिस्तानच्या विरोधात येथील नागरिकांमध्ये राग आहे. त्याच रागातून अफगाण नागरिकांनी हा मोर्चा काढला. पण पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती आहे.
आमचे सैनिक तालिबानशी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढतील
अफगाणिस्तानच्या रस्त्यावर पाकिस्तानविरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. यापूर्वी पंजशीरमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने झाली होती. त्याच वेळी, तालिबानने आपले विरोधी असलेला अफगाणिस्तानचा शेवटचा प्रांत पंजशीरचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. पण अहमद मसूदने तालिबान्यांचा दावा फेटाळून लावत आमचे सैनिक तालिबानशी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढतील. मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तालिबानशी लढत राहीन,”असे अहमद मसूदने म्हटले आहे.