ऑनलाईन टीम / कीव :
काबुल विमानतळावरुन युक्रेनच्या प्रवाशी विमानाचे अपहरण करण्यात आल्याचा दावा युक्रेनचे उपपरराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी केला आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी हे विमान काबुल विमानतळावर उतरले होते.
येवगेनी येनिन म्हणाले, युक्रेनच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून आपल्या देशात परत आणण्यासाठी एक विमान काबूलला पोहोचलं होते. मात्र, रविवारी अज्ञातांनी या विमानाचे अपहरण केले. मंगळवारी हे विमान इराणच्या दिशेने नेण्यात आले आहे. या विमानाचे अपहरण कोणी केले, यासंदर्भात माहिती समोर आली नाही.
दरम्यान, युक्रेनियन लोकांना परत आणण्यासाठी काबूलला गेलेल्या आमच्या कोणत्याही विमानाचे अपहरण झाले नसल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे.









