साहित्य : 4 हिरवी मिरची चिरून, 1 चमचा आलं चिरून, दीड चमचा लसूण चिरून, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 6 कढीपत्ता पाने, 3 बटाटे वाफवून मॅश करून, अर्धा चमचा हळद पावडर, मीठ, बॅटरसाठीः पाऊण वाटी बेसन, अर्धा चमचा हळद, चिमुटभर बेकिंग सोडा, 1 चमचा तेल, मीठ, इतरः तळण्यासाठी तेल, 8 पाव, 4 चमचे सुकी खोबऱयाची चटणी
कृती : हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट बनवावी. गरम तेलात मोहरी तडतडावी. नंतर हिंग आणि कढीपत्ता टाकावा. त्यात बटाटा, हळद आणि मीठ मिक्स करावे. मिश्रण गार झाले की त्याचे 8 समान गोलाकार भाग करून वडा बनवावा. बॅटर साहित्यात पाणी घालून त्यात वडा घोळवून गरम तेलात तळावेत. पावचा अर्धा भाग करून त्यात खोबऱयाची चटणी घालावी. तयार वडा घालून तळलेल्या मिरची सोबत द्या.
चटणीसाठीः गरम तेलात 4 लसूण पाकळय़ा परतवाव्यात. आच बंद करून त्यात 4 चमचे सुखं खोबरं टाकावे. गार झाले की त्यात पाव चमचा लाल तिखट आणि मीठ घालून मिक्सरला लावावे.