पत्रकार तथा बांदा विठ्ठल मंदिरातील सेवक आशुतोष भांगले यांची नाराजी
प्रतिनिधी / बांदा:
एका कापुर कंपनीने टिव्ही वर तसेच वेबसाईट , य़ुट्यूबवर आपल्या कापुर उत्पादनाच्या जाहिरातीसाठी प्रभु श्रीरामचंद्रांची वेशभूषा केलेल्या नाट्यकलाकाराचा वापर केला आहे. वेश श्री रामाचा व वर्तन सामान्य युवकासारखे दाखवून विनोद निर्माण करुन श्री रामभक्तांच्या भावनांची थट्टाच केली आहे. हि जाहिरात दिर्घकाळ सुुरु असून धर्माचे रक्षक म्हणवीणाऱ्या नेत्यांनीही याबाबत मौन पाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या जाहिरातील श्रीरामाची वेशभूषा केलेला पायात बुट घातलेला युवक कोणालातरी आशिर्वाद देतो.टाळी देतो,सेल्फी काढतो. त्याला कापूर आणण्यासाठी आईचा फोन येतो म्हणून डोक्याला हात लावतो. सायकलने दुकानात जाऊन दुकनदाराला दोस्ता एक कापुर दे म्हणून सांगतो. दुकानदार त्या श्रीराम समजून वंदन करतो व देवाला फक्त याच कंपनीचा कापुर वापरा असे सांगुन हा कापुर देतो. त्यानंतर त्याच्यासोबत सेल्फीही काढतो.
बांदा येथिल पत्रकार तथा श्री विठ्ठल मंदिरातील सेवक आशुतोष भांगले यांनी या जाहिरातीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या देशात श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. असंख्य रामभक्त आहेत. धर्माचे रक्षण अजेंड्यात असलेले बलाढ्य पक्ष आहेत. त्या देशात उघडपणे हा श्रद्धास्थानाचा अपमान होत आहे. याबाबत आशुतोष भांगले यांनी एक व्हिडियो प्रसारित करुन जो पर्यंत ही कंपनी ही जाहिरात बंद करुन श्री रामभक्तांची जाहिर माफी मागत नाही.तोपर्यंत आपण या कंपनीचा कापूर वापरणार नसल्याचे जाहिर केले आहे. “तो पर्यंत मी त्या कंपनीचा कापुर वापरणार नाही ” हा त्यांचा व्हिडियो सध्या सर्वत्र गाजत अाहे. ज्या उत्पादनाच्या जाहिरातीत श्री रामाचा उपहास आहे ते उत्पादन मी श्री बांदेश्वराला ,श्री विठ्ठलाला कसे अर्पण करु शकतो. भले कितीही मोठी कंपनी असो तीला आमच्या श्रद्धास्थानाची थट्टा करण्याचा अधिकार नाही.
ही जाहिरात तात्काळ बंद करावी व समस्त भाविकांची जाहीर माफी मागावी तो पर्यंत जगाचे माहीत नाही पण आपण स्वत: या कंपनीचा कापूर वापरणार नाही असे आशुतोष भांगले यांनी जाहीर केले आहे.









