प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे सेवा बजाविताना तब्येत बिघडल्याने येळ्ळूरच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. जोतिबा मनोहर पाटील (वय 40, रा. शिवाजीनगर, येळ्ळूर) असे त्या दुर्दैवी जवानाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.









