कानपूर
कोरोनाचे संक्रमण कमी झाले असताना कानपूर आता झिका विषाणूच्या विळख्यात सापडत चालले आहे. तेथे सातत्याने संक्रमितांची संख्या वाढत आहे. झिका विषाणूचे बुधवारी 25 सक्रीय रुग्ण आढळल्यावर शहरात खळबळ उडाली आहे. शहरात झिका विषाणूचा प्रकोप सातत्याने वाढतोय. दोन आरोग्य कर्मचाऱयांनाही याची लागण झाली आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या वाढून 36 झाली आहे. संक्रमण वेगाने फैलावत असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. प्रशासनाने देखरेख पथकांची स्थापना केली आहे. ही पथके झिकाप्रभावित क्षेत्रांच्या तीन किलोमीटरच्या कक्षेत देखरेख ठेवणार आहेत. जिल्हाधिकारी दररोज पथकाच्या अहवालाचा आढावा घेणार आहेत. झिका विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच वायुदलाच्या रुग्णालयातही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









