संग्राम कासले / मालवण :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत गोडय़ा पाण्यातील मत्स्य संशोधन व महाविभाग, मुळदे, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि नीलक्रांती मत्स्य पर्यटन सहकारी संस्था, मालवण यांच्या संयुक्त सहकार्याने कांदळगाव (ता. मालवण) येथील शेतकरी भूषण सुर्वे यांच्या खासगी मालकीच्या जमिनीत पावसाळी हंगामात जांभ्या कातळ जमिनीत तयार होणाऱया हंगामी तलावातील गोडय़ा पाण्यातील कटला व रोहू या जातीच्या मासळीच्या जीवाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण तपासून अशा प्रकारचा उपक्रम यशस्वी होऊ शकेल का? या बाबतची चाचणी शेतकऱयांना सहभागी करून माहे ऑगस्ट 2019 मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. सदर चाचणीचे निष्कर्ष, विद्यापीठ शास्त्रज्ञ व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकताच घेण्यात आली असता अतिशय आशादायक निष्कर्ष प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.
19 ऑगस्ट 2019 रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत व हस्ते ही चाचणी कांदळगाव येथील सडय़ावर पावसाळी हंगामात पाणी साचून तयार झालेल्या सुमारे 1.5 एकर क्षेत्रफळाच्या आणि सहा फूट खोलीच्या तळय़ात घेण्यात आली होती. या तळय़ात गोडय़ा पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प मुळदे येथे तयार करण्यात आलेले सुमारे 30,000 नग मत्स्यबीज वाढविण्याकरीता सोडण्यात आलेले होते. मत्स्यबीज पूर्णपणे नैसर्गिक तत्वावर वाढविण्यात आले. सप्टेंबर 2019 व जानेवारी 2020 मध्ये मत्स्यबिजाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण याची तपासणी मुळदे येथील शास्त्रज्ञांनी केली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात या मत्स्यबिजाची अंशत: काढणी करण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात सुमारे 1750 वाढलेली मत्स्यबीज तळय़ातून काढून जिवंत स्थितीत वाहतूक करून धामापूर येथील तलावात सोडण्यात आली. काढणीच्या वेळी केलेल्या पाहणीत तळय़ातून सुमारे 10,000 नग मत्स्यबीज मिळू शकेल, असे दिसून आले आहे. उरलेल्या बिजाची काढणीही लवकरच करण्यात येणार असून प्राथमिक काढणीत ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मत्स्यबिजाची वाढ सरासरी 100 ग्रॅम प्रतिनग एवढी मिळाली. सहा महिन्यानंतर हे मासे सुमारे 60 ते 80 रुपये प्रतिनगाने उपलब्ध होणार आहेत.
हंगामी काळात पर्यायी उत्पन्न स्त्राsत
माहे डिसेंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत या तळय़ातील सुमारे चार ते पाच हजार नग मत्स्यबीज वाहून गेल्याचे निदर्शनास आले होते. असे असतानाही अंदाजे दहा हजार नग मत्स्य बोटुकली या तळय़ातून प्राप्त होणार आहे, असे चित्र आहे. त्यामुळे हा उपक्रम फायदेशीर असून अशा प्रकारच्या अन्य ठिकाणी हा उपक्रम भविष्यात राबविण्यास शेतकऱयात हंगामी काळात एक पर्यायी महत्त्वाचा उत्पन्न स्त्राsत मानून निर्माण होऊ शकेल. कोकणामध्ये हा उपक्रम पहिल्यांदाच घेण्यात आलेला असून यात नीलक्रांती संस्थेचे प्रमुख रविकिरण तोरस्कर यांचे मोलाचे प्रयत्न आहेत.
जिल्हय़ात उपक्रमाचा प्रचार करणार – रविकिरण तोरस्कर
गोडय़ा पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धनात प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन सावंत व त्यांचे सहकारी डॉ. मनोज कुगुरुवार, कृपेश सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. मागील चार ते पाच महिने त्याची निरीक्षणे वेळच्या वेळी नोंदवून चाचणी यशस्वी करण्याकरीता सोबतचा सहभाग नोंदवला. भविष्यात हा उपक्रम असून आणखी शास्त्राsक्त पद्धतीने या ठिकाणी राबवून तो व्यापारी तत्वावर राबविण्याकरीता ही संपूर्ण टीम एकत्रितरित्या प्रयत्न करीत असून जिल्हय़ात वा अन्य भागात याचा प्रचार करण्याकरीता प्रयत्न केले जातील, असे रविकिरण तोरस्कर यांनी सांगितले. तसेच जे शेतकरी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, खासगी आस्थापना यांना आगामी पावसाळी हंगामात मत्स्य पालन करायचे असेल, त्यांनी संस्थेच्या कार्यालयात (9404900303) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. लवकरच जिल्हाधिकाऱयांना भेटून सदर उपक्रमाचे सादरीकरण करणार आहे व जिल्हा प्रशासनाच्या अनुदानित योजनांमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार येणार असल्याची माहिती नीलक्रांती वि. का. पणन कृषी मत्स्य पर्यटन सहकारी संस्था कोळंबच्या सदस्या स्मिता केळुस्कर यांनी दिली आहे.









