प्रतिनिधी / वडूज :
कातरखटाव-पळसगाव मार्गावर कारचालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी कार रस्त्याच्या बाजूच्या खड्डयात पलटी झाली. या अपघातात तीनजण जखमी झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली.
विठ्ठल गणपत जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर दिपक विठ्ठल जाधव, सुशीला विठ्ठल जाधव, सचिन जाधव हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि गुरसाळे ता. खटाव येथील हुंदाई क्रेटा एम. एच.43- बी. एन.7503 ही चारचाकी पळसगांवकडून कातरखटावकडे येत असताना चालकाचा अचानक ताबा सुटल्याने चारचाकी खड्डयात जावून पलटी झाली. यामध्ये दिपक जाधव, सुशीला जाधव, सचिन जाधव हे जखमी झाले. तर विठ्ठल जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.









