प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यात 26 रोजी 4 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून सध्या तालुक्यातील एकूण 10 रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहेत. चार रस्ता येथील कोरोनाबाधित आढळलेल्या भाजीविक्रेत्याची पत्नी व मूल तसेच आगोंद येथील टाईल्स फिटरच्या एका मुलाचा यात समावेश आहे. त्याशिवाय पणसुले येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या सूत्रांनी दिली.