प्रतिनिधी/ काणकोण
18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 15 पासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला असून काणकोणच्या चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात आयोजित केलेल्या या मोहिमेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन पद्धतीने आगावू बुकिंग करून आलेल्या बहुतेक सर्व युवक-युवतींचा यात समावेश होता. पहिल्या दिवशीचा कोटा भरून पूर्ण झाला होता, अशी माहिती आरोग्य केंद्राकडून देण्यात आली.
यावेळी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमेय अय्या, पीएचएन प्रशांत खोलकर, अन्य परिचारिकांनी सहकार्य केले. सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई आणि विद्यालयातील कर्मचारी वर्गाने ही मोहीम यशस्वी होण्यासाठी चांगली सोय केली, तर या वॉर्डाच्या नगरसेविका सारा शांबा देसाई यांनी पहिल्या दिवशी लसीकरणासाठी आलेल्या सर्व युवक-युवतींच्या अल्पोपहाराची खास व्यवस्था केली. काणकोण भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, सचिव दामोदर च्यारी, सूरज कोमरपंत या ठिकाणच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित होते.









