प्रतिनिधी / म्हापसा
काणका सर्कल जवळ बेकायदेशीररित्या रितसर परवानगीशिवाय काही बिगर गोमंतकीय नागरिक मासे तसेच डमरू विकणारे थिगूर मासे रस्त्यावर उघडय़ावर विकत होते त्याची दखल म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी घेऊन अखेर तेथील सर्व दुकाने गुरुवारी सायंकाळी बंद पाडण्यात यश मिळविले.
काणका सर्कलजवळ जाफर हा मासे विक्री तर त्याच्या बाजूला फळे व भाजी विक्री करण्यात येत होती. या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने त्याचे फोटो सोशल मिडियावरून व्हायरल झाल्याने त्याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी या ठिकाणची सर्व दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडली. शिवाय दोघां पोलिसांची गस्तही या ठिकाणी लावण्यात आली. बुधवारी सायंकाळी या ठिकाणी रस्त्यावर डमरू विकणाऱया नागरिकांनी मोठे थिगूर नामक मासे विक्रीस आणले असता बघ्यांनी व खवय्यांनी एकच गर्दी केली होती, याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली.