रत्नागिरी प्रतिनिधी
हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागेला लागलेल्या वनव्य आटोक्यात आणताना होरपळून शेतकऱ्याचा दृदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
गोविंद विश्राम घवाळी ( 65) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. वणवा आटोक्यात आणताना आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली.








