नानोडा-कासारपालमधील शेतकऱयांचे नुकसान
प्रतिनिधी / पणजी
डिचोली तालुक्यातील नानोडा-कासारपाल या भागातील केवळ काजू व्यावसायावर गुजराना करणाऱयांचा कच्चा काजू गोवा बागायतदार डिचोली शाखेने दोन वेळा परत पाठवल्याने शेतकरीवर्गाने बरेच नुकसान झाले. येथील बागायदार विक्रम वझरकर, दत्ता साखळकर, लक्ष्मी वझरकर यांना गेल्या आठवडय़ात कटू अनुभव आला. कासारपाल नानोडा येथून कच्चा काजू घेऊन गोवा बागायदारच्या डिचोली शाखेत त्याची विक्री करण्यासाठी आणला असता काजू काळे पडले ते साफ करून आणण्यास सांगितले. त्यानंतर शेतकऱयांनी तीन दिवसांत काजू धुवून सुकवून परत आणले असता ते अद्याप ओलसर असल्याचे कारण दर्शवून परत पाठवले. एका गाडीतून 8 क्विंटल एवढा काजू शेतकऱयांनी आणला होता. प्रत्येकवेळी सुमारे 700 रुपयांचे गाडी भाडे शेतकऱयांना खर्च करावे लागले. एवढे असून काजू परत आपापल्या घरी घेऊन जाणे भाग पडले. नंतर खासगी क्षेत्रात या शेतकऱयांना प्रतिकिलो रु. 90 या दराने विकने भाग पडले. कारण तिसऱयांदा काजू फेटाळून लावल्यानंतर बसल्या जागी शेतकऱयांना नुकसान व्हायचे. बागायतदार संस्थेच्या अधिकाऱयांनी शेतकऱयांना त्रास होऊ नये, यासाठी काही आदेश आपल्या शाखेतील कर्मचाऱयांना द्यावेत. शेतकऱयांना काजू दोनवेळा फेटाळल्याने रु. 1400 चे नुकसान तर झालेच शिवाय वेळ व श्रमही वाया गेले आणि पश्चाताप झाला









