जिल्हाधिकारी एम. जी. हिरमेठ : 22 ऑक्सिजन बेड रिकामे : गाफील न राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कागवाड
गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग फैलावला होता. पण त्याला सध्या उतरती कळा सुरू झाली आहे. अथणी व कागवाड येथे 22 ऑक्सिजनसह इतर बेड रिकामे आहेत. बेळगाव येथेही 50 ऑक्सिजन बेड रिकामी आहेत. ही एक सकारात्मक बातमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दै. तरुण भारतशी बोलताना दिली. कागवाड तालुक्मयातील कोविड केअर सेंटरना भेटी देऊन येथील कोरोनाची वस्तूस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी नुकतेच आले होते. यावेळी कागवाड येथील तहसीलदार कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वॉर रुमची पाहणी करून ते बोलत होते.
कागवाड व अथणी तहसीलदार व त्यांच्या सहकाऱयांनी कोरोना नियंत्रणासाठी शासनाने जे नियम घालून दिले होते त्याचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे. त्यांना कोरोना योद्धय़ांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनामुक्त करण्यासाठी तालुक्मयातील तहसीलदार, इतर अधिकारी, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन त्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांना घरीच उपचार करू न देता कोविड सेंटरवर आणून त्यांना उपचाराकरिता लागेल ती व्यवस्था देण्याचे आदेश दिले आहे.
त्याप्रमाणे घरोघरी जाऊन अधिकारी माहिती घेत आहेत. सार्वांनी घरी आलेल्या अधिकाऱयांना सविस्तर माहिती देत घरीच उपचार करून न घेता कोविड सेंटरवर येणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
यावेळी चिकोडीचे उपविभागीय अधिकारी युकेश कुमार, कागवाड तहसीलदार प्रमिळा देशपांडे यांनी सविस्तर माहिती अधिकाऱयांना दिली. यावेळी उपतहसीलदार आण्णासाहेब कोरे, सीडीपीओ संजीवकुमार सदलगे, ता. पं. अधिकारी वीरणगौडा एगणगौडर, महसूल निरीक्षक एस. बी.मुल्ला, बसवराज बोरगल्ल, सीपीआय शंकरगौडा पाटील, पीएसआय शिवराज नायकवडी यांच्यासह इतर अधिकाऱयांची उपस्थिती होती.









