कागल / प्रतिनिधी
कागल शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. आज एकाच दिवशी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कागल शहर खळबळ उडाली आहे. यामध्ये गैबी चौकातील बाधिताच्या संपर्कातील सात जणांचे व अनंत रोटो वसाहतीतीलच एका तीस वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
दोन दिवसा पूर्वी शहरातील गैबी चौकातील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या तीव्र संपर्कातील दहा जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यातील सात जणांचे पॉझिटिव्ह आले. शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वच शासकीय अधिकारी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. यामुळे इतर तालुक्याच्या प्रमाणात कागल तालुक्यात रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र सोमवारी एकाच कुटूंबातील जणांचे व इतर एक असे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच येथील अनंत रोटो वसाहतीतील एक तरूण स्वतःहून स्वॅब तपासणीसाठी आला. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संबधित रुग्णांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे.
दरम्यान शहरामध्ये आठ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामधील गैबी चौक व अनंत रोटो परिसरातील पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कामध्ये जर कोणी आले असेल त्यांनी, तसेच या कंटेन्टमेंट झोनमधील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला इ. कोरोना लक्षणे दिसत असतील तर त्यांनी स्वतःहून कागल कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








