कागल / प्रतिनिधी
दोघा तरुणांच्या विरोधात विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा कागल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पिडीत महिलेने पोलीसांत दाखल केली. ठार मारण्याची धमकी देऊन गेल्या वर्षभरापासून आपल्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादित नमूद आहे.
या प्रकरणी सुशांत शंकर घाटगे (वय ३०, कागल) आणि संकेत बाळू माने (वय २५, लिंगनूर दुमाला) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleदुबळे माझे हात
Next Article देशातील मोबाईल कॉलिंग सुविधेला 25 वर्षे पूर्ण








