कागल / प्रतिनिधी
कागल नगरपरिषदेने शहरातील ५० वर्षावरील नागरीकांची कोरोना अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे . मुजावर गल्ली, नायकवडी गल्ली आणि कोष्टी गल्लीतील १५२ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. शहरातील कोरोना हॉटस्पॉट परिसरात ही तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गापासून काही महिने लांब राहिलेल्या कागल शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. कोरोनामुळे शहरातील ८ जणांचा मृत्यू झाला. शहरात दरदिवशी कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे . कोरोनाचे रूग्ण शोधून त्याच्यांवर त्वरीत उपचार करणे आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबिले. त्याप्रमाणं गामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने पालिकेने कोरोना अॅटिजेन रॅपिड स्टेस्ट घेण्यास सुरूवात केली.
गैबी चौक, मुजावर गल्ली, नायकवडी गल्ली आनि जयसिंगराव पार्क कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे पालिकेने या भागातील ५० वर्षा पुढील नागरीकांची कोरोना अॅटिजेन स्टेस्ट घेण्यास सुरुवात केली आहे . बुधवारी दुपारपासून या चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे. मुजावर गल्ली , नायकवडी गल्ली आणि कोष्टी गल्लीतील १५३ लोकांची तीन दिवसांत तपासण्या करण्यात आल्या आहेत. याच्यात १५ जण
कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. आतापर्यंत शहरातील रूग्णसंख्या १६० झालीय. ७४ पण उपचार घेऊन घरी गेलेत. आठ जणांचा मृत्यू झालाय. तर ७८ रूग्णांवर विविध ठिकाणी उपचार केले जात आहेत . अधिकाअधिक लोकांची तपासणी करून कोरोनाचे रूग्ण शोधणे. त्यांच्यावर वेळेत उपचार करून संभाव्य मृत्यू टाळण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबिले आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









