प्रतिनिधी / कागल
कागल तालुक्यात कोरोनाचे आज नवीन चार रुग्ण आढळून आले आहेत. याच्यात शहरातील ९० वर्षाच्या वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांच्या संपर्कातील ३१ लोकांचे स्वॅब घेण्यात आलेत.
कागल तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या आता ७० झालीय.५९ रुग्ण बरे झाले आहेत. कागल शहरातील मुख्य बाजारपेठेत ९० वर्षाच्या वृद्धाला संसर्ग झाला आहे. त्याला उपचाराकरिता सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बामणी येथील एका महिलेला आणि लिंगनुर दुमालातील मुलग्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.या रुग्णांच्या संपर्कातील ३१ लोकांचे स्वॅब घेण्यात आलेत. कागल शहरात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडल्यानं मोठी खळबळ उडालीय. रुग्ण सापडलेला परिसर पालिकने बंदीस्त केला असून औषध फवारणी केली आहे.
Previous Articleसलग दुसऱया दिवशीही दोनशेचा आकडा पार
Next Article मोदींच्या उपस्थितीत 5 ऑगस्टला भूमिपूजन








