कागल/ प्रतिनिधी
येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या २९ रुग्णांपैकी ९ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्या एका महिलेने बाहेर आल्यानंतर आनंदाश्रू वाहत सगळ्यांचे आभार मानले. सर्वांना गुलाबपुष्प देऊन व पृष्पवृष्टी करून शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये मुगळी, आलाबाद, दौलतवाडी, हमिदवाडा, मळगे येथील नागरिकांचा समावेश आहे. सर्वांना केएमटीने त्यांच्या गावात सोडण्यात आले. तालुक्यातील हे पहिले कोरोना मुक्त आहेत.
यामध्ये मुगळी येथील २० व २९ वर्षीय युवक,४४ वर्षीय महिला व ४५ वर्षीय पूरुष, आलाबाद येथील १५ वर्षीय मुलगा, दौलतवाडी येथील १७ वर्षीय मुलगा व ५२ वर्षीय पुरूष, हमिदवाडा येथील ५३ वर्षीय पुरुष मळगे येथील २६ वर्षीय तरूणी यांचा समावेश आहे.
डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचे चेअरमन नवीद मुश्रीफ, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, डॉ. अभिजित शिंदे, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगुडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, नवल बोते, सतीश घाडगे, आनंदा पसारे, नासिर नाईक तसेच पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








