प्रतिनिधी / कागल
ऑगस्ट अखेर कागल तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कारभार आता प्रशासक सांभाळणार आहे. विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांना सरपंचपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्ती किंवा युध्द किंवा वित्तीय आणिबाणी किंवा प्रशासकिय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य झाले नाही त्यामुळे राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम
१९५९ च्या कलम १५१ मधील पोट-कलम १ मध्ये,खंड (क) मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासन स्तरावरील अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले. त्यानुसार ७ ऑगस्ट अखेर मुदत संपणाऱ्या कागल तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालणेचे दृष्टीने प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे .
ग्रामपंचायतीचे नाव व प्रशासक पुढीलप्रमाणे – उंदरवाडी – अनुराधा चंद्रकांत दळवी (पर्यवेक्षिका), चिखली – सुरेश महादेव कुंभार ( विअप), मळगे बुद्रुक – राजेंद्र बाबुराव सिद्धन्नावर (विअकृषी), व्हन्नूर – सारिका बाळासो किणेकर (शिक्षण विस्तार अधिकारी), कुरुकली – सुरेश महादेव कुंभार ( विअप), बानगे – विद्या रणधीर लांडगे ( पर्यवेक्षिका), हसुर खुर्द – सुरेश महादेव कुंभार, बेलवळे बुद्रुक – अमोल बाबुराव मुंडे ( वि अप), एकोंडी – सारिका बाळासो किणेकर (शिक्षण विस्तार अधिकारी), शंकरवाडी – सुरेखा भाऊ कांबळे (वि असांख्यिकी), बिद्री – अमोल बाबुराव मुंडे, हळदी – जयश्री किरण सनगर ( पर्यवेक्षिका), आलाबाद – जयश्री किरण सनगर (पर्यवेक्षिका), तमनाकवाडा – रामचंद्र विष्णू कांबळे ( विअशिक्षण), करंजिवणे – गोपाळ कल्लाप्पा कोळी ( शाखा अभियंता), वडगाव – मारुती बापू यादव ( शाखा अभियंता), बस्तवडे – राजेंद्र बाबुराव सिद्धन्नावर ( विअ कृषी), केनवडे – सूरय्या लालासाहेब मुल्लाणी (पर्यवेक्षिका ), शिंदेवाडी – अनुराधा चंद्रकांत दळवी ( पर्यवेक्षिका), शेंडूर – राजेंद्र बाबुराव सिद्धन्नावर ( विअ कृषी), करनूर – सुनील शामराव कांबळे ( कनिष्ठ अभियंता), म्हाकवे – अशोक बाबुराव पाटील ( कनिष्ठ अभियंता), लिंगनूर दुमाला – मोहन बापू कोळी ( शाखा अभियंता), मेतके – मोहन बापुसो कोळी ( शाखा अभियंता), मळगे खुर्द – विजया भानुदास कुलकर्णी (पर्यवेक्षिका), साके – रामचंद्र शिंगाडी गावडे (शिक्षण विस्तार अधिकारी), कासारी – विजय वासुदेव कुलकर्णी ( कनिष्ठ अभियंता), सिद्धनेर्ली – दिपक आनंदराव कुराडे (शाखा अभियंता), बोळावीवाडी – रामचंद्र विष्णू कांबळे (शिक्षण विस्तार अधिकारी), हळदवडे – गोपाळ कल्लाप्पा कोळी (शाखा अभियंता), बेनिक्रे- दिपक आनंदराव कुराडे (शाखा अभियंता), लिंगनूर कापशी – सुरेश महादेव कुंभार ( विअप ), माध्याळ – सुरेश महादेव कुंभार (विअप ).
प्रशासक पदासाठी गावागावात इच्छूक असलेल्या कार्यकत्यांनी फिल्डींग लावली होती . मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमनुकीमुळे झ्च्छूकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे .
Previous Articleकॅमेरा पुरस्कारासाठी एक होतं पाणीची निवड
Next Article राजस्थानात कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार पार








