वार्ताहर / वंदूर
गतवर्षाची महापूराची ग्रामस्थानी घेतलेली धास्ती पाहता आणि पुरग्रस्तांची तळमळ पाहता कागलच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी करनूर गावास भेट दिली. पुरग्रस्तांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांची व्यथा जाणून घेतली. व यातून लवकरच सुखकर मार्ग काढू असे अभिवचन त्यानी दिले.
करनूरला गेल्यावर्षी महापुराने विळखा घातला होता. त्यामध्ये अनेक जणांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. याहीवर्षी पुरचा धोका पाहुन. ग्रामपंचायतीने पावसाच्या सुरुवातीला आम्ही कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही .पूरपरिस्थितीमधे आपण काळजी घेऊन योग्य त्या ठिकाणी स्थलांतर व्हावे. अशा प्रकारच्या नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन आम्हाला जागा मिळावी अशा मागणीचे निवेदन दिले.
त्यानंतर पुरग्रस्तांनी तहसीलदार कार्यालय मध्ये जाऊन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन त्यांना पूरस्थिती कल्पना दिली. तात्काळ तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी करनूर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तसेच गावठाण येथे शिल्लक असलेल्या जागेची पाहणी केली व पूरग्रस्त लोकांना जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी साजिद शेख , हैदरअली शेख , इम्रान नायकवडी ,दशरथ नलवडे, बाळासो हा.शेख , कासम शेख ,शकील शेख, अनिल नलवडे समीर शेख, राजूअालासे , रहमान शेख कलंदर शेख ,शरपूद्दिन आलासे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









