प्रतिनिधी / कागल
कागल येथे गाईच्या दूध दरवाढीसाठी भाजप व मित्र पक्षांच्या वतीने आंदोलन केले. या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गैबी चौकामध्ये नागरिकांना दुधाचे वाटप केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये दरवाढ व दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये प्रमाणे अनुदान मिळावे. अशी मागणी शासनाकडे केली आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने कागल भाजप व मित्र पक्षांच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी गाईच्या दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भुकटीला प्रतिकिलोस पन्नास रूपये अनुदान द्यावे, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी बाजार समितीचे माजी चेअरमन बाबगोंडा पाटील, दूधगंगा दूध डेअरीचे चेअरमन अजितसिंह घाटगे, व्हाईस चेअरमन प्रमोद कदम, बाळासो हेगडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यास सुद्धा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








