वार्ताहर /काकती
येथील मठ गल्लीत सोसाटय़ाच्या वाऱयाच्या तडाख्यात आंब्याचे झाड मोडून घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. घरमालकाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
रविवार दि. 10 रोजी रात्री नऊच्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱयासह विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. नेमकी याचवेळी हेस्कॉमची वीज गायब झाली. शेजारच्या करेव्वा देवाचा आम्रवृक्ष मोडून भीमसेन चन्नाप्पा कुंभार यांच्या सिमेंट काँक्रिटच्या घरावर कोसळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लागलीच नेशल रक्षक रयत संघाचे कार्यकर्ते मोहन कंग्राळकर, श्रीकांत काजगार, सुनील मोळेराखी आदींनी तुटलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. झालेले नुकसान प्रशासनाकडून मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. काकतीचे ग्राम लेखाधिकारी प्रकाश गमाणी यांनी पंचनामा केला.









