घटस्फोटीत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱया आरोपीमुळे झाली लागण
प्रतिनिधी / बेळगाव
काकती पोलीस स्थानकातील एका पोलीसाला कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या 27 वषीय पोलिसावर उपचार करण्यात येत आहेत. तर पाच पोलिसांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
8 जुलै रोजी विरभद्रनगर येथील एका 38 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. काकती पोलिसांनी 6 जुलै रोजी त्याला अटक केली होती. आपल्या घटस्फोटीत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन त्याला अटक झाली होती. या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सहा पोलिसांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.









