विजय थोरात / सोलापूर
सोलापूर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये यंदा कांद्याला चांगला दर मिळाल्याने बाजार समितीत कांद्याचाच हंगाम दिसून आला. एक डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान आठ लाख नऊ हजार 327 क्विंटल कांद्याची विक्री करुन त्यातून 285 कोटी 86 लाख 64 हजार 400 रुपयांची उलाढाल झाल्याने सोलापूरच्या बाजारात कांद्याची चांदीच झाली.
यंदा सरासरी पाच हजार ते साडे पाच हजार रुपये प्रतिक्ंिवटल दर होते. मागील महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळला. त्यावेळी कांद्याचा दर हा प्रति क्विंटल 20 हजारांवर गेला होता. परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. यात कांदाही सुटला नाही. सुरुवातीला भाव खालेला कांद्याचा दर आता कमी झाले असले तरी आवक मात्र रोज वाढतच आहे.
1 डिसेंबर पासून ते 31 डिसेंबर पर्यत कांद्याची एकूण आठ लाख नऊ हजार 327 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. सरासरी कांद्याला दोन हजार ते तीन हजार 500 प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. जास्तीत-जास्त 10 हजार भाव आहे. एक डिसेंबरपासून जरी कांद्याला भाव कमी मिळत असला तरी मार्केटमध्ये कांद्याची मोठी उलाढाल झाली. एकूण उलाढाल ही 285 कोटी 86 लाख 64 हजार 400 रुपयांची झाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात कांद्याचे भाव कमी झाले तरीदेखील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आणि उलाढाल चांगली झाल्याचे बाजार समितीचे सचिव उमेश दळवी यांनी सांगितले.
आवक वाढल्याने दर स्थिर
मागील महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात कांद्याची आवक वाढली असून. भाव कमी मिळत आहेत. सध्या कांद्याचे भाव स्थिर आहेत. चालू महिन्यात कांदा चांगला आणि दर्जेदार येत असल्याने बाजार समितीध्ये उलाढाल देखील चांगली होत आहे.
उमेश दळवी, सचिव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
ओला अन् खराब मालाचा समावेश
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. मात्र दर जरी घसरले तरी देखील कांद्याची आवक कमी होताना दिसून येत नाही. बाजार समितीमध्ये येणारा माल हा ओला आणि खराब येत असल्याने कांद्याला कमी भाव मिळत आहे. जुन्या कांद्याला दर चांगला मिळत आहे. नवीन कांदा देखील मोठय़ा प्रमाणावर येत असल्याने कांद्याचे दर कमी होत आहेत.
अल्ताफ बागवान, आडत व्यापारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती