60 मृतदेह हाती- प्रवाशांनी खचाखच भरल्याने दुर्घटना
किन्हासा / वृत्तसंस्था
आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये बोट पलटी होऊन 60 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच अन्य 50 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. हा अपघात कांगो नदीत झाला. शनिवारपर्यंत 60 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक बेपत्ता असल्याचे वायव्य मोंगला प्रांताचे राज्यपाल नेस्टर मॅग्बाडो यांनी सांगितले. या दुर्घटनेत 39 लोकांना वाचविण्यात यंत्रणांना यश आले. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना सामावून घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.









